नागपूर येथील रामटेक परिसरातील मौदा या ठिकाणी तब्बल 800 मुनिया या पक्ष्याची शिकार करून त्यांना घेऊन जाणाऱ्या तीन शिकाऱ्यांना वनाधिकाऱ्यांनी पकडले. रविवारी भंडारा नागपूर महामार्गावरील माथनी टोल नाक्यावर हा प्रकार घडला.
मुनिया या आकाराने केवळ 10 सेमीचा पक्षी असतो. राजस्थान, पंजाब आणि उत्तरेकडील काही राज्याचा भाग वगळता तो भारतभर सर्वत्र आढळतो. मुनिया पक्ष्याना बाळगणे, शिकार तसेच विक्री करणे हे वन्यजीव संवर्धन कायदा 1972 नुसार वनगुन्हा ठरते. मुनिया पक्ष्याची शिकार करुन भंडारा नागपूर महामार्गावरील माथनी टोल नाक्यावरून त्यांना घेऊन जात असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार वनाधिकाऱ्यांनी टोल नाक्यावर सापळा रचला.
( हेही वाचा: …तर मुंबईतील वाढत्या गोवरच्या साथीबाबतचा अहवाल थेट दिल्लीत? )
माथनी टोल नाक्यावर होंडा ॲक्टिवा या दुचाकीवाहनावरून यशवंत देवराव डायरे आले असता त्यांच्या बॅगेत असलेल्या सामानाबाबत टोल नाक्यावरील वनाधिकाऱ्यांना संशय आला. त्यांची बॅग तपासली असता त्यात 800 मुनिया पक्षी आढळले. चौकशीनंतर अजून दोन आरोपींना वनाधिकाऱ्यांनी अटक केली.
Join Our WhatsApp Community