विमानतळाचे ८४ कर्मचारीच फुल्ल टल्ली! DGCA च्या अहवालातून उघड

97

देशभरातील विमानतळांवर काम करणारे ८४ कर्मचारी सेवेदरम्यान फुल्ल टल्ली असल्याचे समोर आले आहे. म्हणजेच  ते कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत आढळले आहेत. हवाई वाहतूक डीजीसीएच्या नियमानुसार, महासंचालनालयाच्या (DGCA ) अहवालातून ही माहिती उघड झाली असून, यामध्ये ५४ चालकांचा सहभाग आहे. जानेवारी २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान देशभरातील विमानतळांवर ४२ कर्तव्यावर असलेले ८४ कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत आढळले. यामध्ये ५४ चालकांचा समावेश असून, एकूण मद्यपींमध्ये हे प्रमाण जवळपास ६४ टक्के इतके असल्याचे डीजीसीएच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

(हेही वाचा – ‘बेस्ट’च्या कंत्राटी मिनीबस चालकांचं पुन्हा कामबंद आंदोलन!)

DGCA च्या अहवालातून उघड

अहवालातून असेही समोर आले की, ब्रेथ अॅनालायझर (बीए) चाचणीत दोषी आढळलेल्या इतर कर्मचाऱ्यांत एरोब्रीज ऑपरेटर, लोडर, वायरमन, पर्यवेक्षक ग्राऊंड हँडलिंग, विमान देखभाल आणि अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. डीजीसीएने सप्टेंबर २०१९ मध्ये विमान कर्मचाऱ्यांसाठी विशेष नियमावली लागू केली. विमानतळ ऑपरेटरला केवळ त्यांच्या कर्मचाऱ्यांचीच नव्हे, तर विमानतळावर परवानगी दिलेल्या इतर कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचीही नियमितपणे मद्य तपासणी करावी लागणार आहे, असा नियम त्यात अंतर्भूत करण्यात आला आहे.

दररोज १० टक्के कर्मचाऱ्यांची चाचणी

विमानतळावर सेवा देणाऱ्या प्रत्येक कंपनीतील किमान १० टक्के कर्मचाऱ्यांची दररोज रॅण्डम पद्धतीने ब्रेथ अॅनालायझर चाचणी करणे अनिवार्य आहे. जर कर्मचारी चाचणीदरम्यान पहिल्यांदा मद्यधुंद अवस्थेत आढळला, एखाद्याने चाचणीस नकार दिला किंवा विमानतळ परिसराच्या बाहेर पडून चाचणी टाळण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा परवाना तीन महिन्यासाठी निलंबित केला जाईल किंवा सेवा तात्पुरती खंडित केली जाईल.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.