पुण्यातून गेल्या ७ महिन्यात ८४० महिला बेपत्ता!

88

पुण्यातून गेल्या सात महिन्यात ८४० महिला बेपत्ता झाल्या आहे. त्यापैकी ३९६ महिला सापडल्या असल्याची माहिती पुणे शहर पोलिसांनी दिली आहे. जानेवारीपासून आतापर्यंतच्या आकडेवारीत जूनमध्ये सर्वाधिक १८६ महिला बेपत्ता झाल्याची नोंद झाली असून त्यानंतर मे महिन्यात १३५ महिला बेपत्ता झाल्या आहेत.

या कारणांमुळे स्त्रियांनी सोडले घर

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा विचार करता ८८५ महिला बेपत्ता झाल्या आहेत, तर पुणे ग्रामीण पोलिसांनी याच कालावधीत ७४३ महिला बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. यातील बहुतांश महिला कौटुंबिक कलह, नातेसंबंध किंवा नोकरीच्या संधींमुळे घर सोडतात आणि अनेकजण आपली चूक लक्षात घेऊन परततात. त्याचबरोबर १६ ते २५ वर्षे वयोगटातील बहुसंख्य स्त्रिया घरगुती भांडण किंवा पालकांसोबत घरातील भांडणामुळे घर सोडतात, असे पोलिसांनी सांगितले आहे.

(हेही वाचा – Indian Railways : रेल्वेच्या ‘या’ FREE सेवांबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या!)

या बेपत्ता महिलांमध्ये मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या किंवा रस्त्यावर राहणाऱ्यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्ते मात्र या हरवलेल्या केसेस मानवी तस्करीपासून वेगळे करता येणार नाहीत यावर भर देताना दिसतात. बेपत्ता झालेल्या महिलांची ही सामूहिक संख्या असून कौटुंबिक वाद, नातेसंबंध, प्रियकराकडून लग्नाच्या बहाण्याने आमिष दाखविणे अशी अनेक कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. एकाही दुव्याकडे दुर्लक्ष होत नसून प्रत्येक मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा कक्षाचे पोलिस निरीक्षक अण्णा माने यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.