मालदीवच्या राजधानीत भीषण अग्नितांडव! 9 भारतीयांसह 10 जणांचा होरपळून मृत्यू

मालदीवची राजधानी माले येथे गुरूवारी एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीत परदेशी कामगार राहत होते. इमारतीच्या तळमजल्यावर कार दुरुस्तीच्या गॅरेजमध्ये आग लागली. या घटनेत 9 भारतीयांसह एका बांगलादेशी नागरिकाचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत.

(हेही वाचा – ‘… सत्ता गेल्याने पुरोगाम्यांची फालतूगिरी!’, शरद पोंक्षेंचा राष्ट्रवादीवर घणाघात)

माले इथल्या एका इमारतीला आग लागल्यानंतर वरच्या मजल्यावरून 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या कार दुरुस्तीच्या गॅरेजमध्ये ही आग लागली.अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार की, आम्ही 10 मृतदेह बाहेर काढले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे चार तास लागले. मृतांमध्ये नऊ भारतीय आणि एका बांगलादेशी नागरिकांचा समावेश असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या घटनेनंतर मालदीव येथील भारतीय दुतावासाने माले येथील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांबाबत दुःख व्यक्त केले आहे. तसेच आम्ही मालदीव येथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी +9607361452; +9607790701 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here