गोवर आटोक्यात येत असताना मुंबईतील मुंबई सेंट्रल येथील मदनपुरा येथे नऊ वर्षांच्या मुलीचा गोवरमुळे मृत्यू झाल्याचा संशय मुंबई महापालिका आरोग्य विभागाने बुधवारी व्यक्त केला. या मुलीने गोवरप्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतली नव्हती. या मुलीला गोवर झाला होता. मुलीच्या मृत्यूचे कारण मृत्यू अवलोकन समितीच्या अहवालानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली.
नेमकी घटना काय
१२ डिसेंबरला मुंबई सेंट्रल येथील मदनपुरा येथील नऊ वर्षांच्या मुलीला ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास सुरु झाला. पाच दिवसानंतर तिच्या शरीरावर पुरळ दिसू लागले. २२ डिसेंबरला मुलीच्या कुटुंबीयांनी तिला स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मुलीची तब्येत खालावल्याने पहाटे १ वाजून ५० मिनिटांनी कुटुंबीयांनी तिला स्थानिक रुग्णालयातून पालिका रुग्णालयात हलवले. रुग्णालयात दाखल करताच तिला ऑक्सिजनवर डॉक्टरांनी उपचार सुरु केले. मात्र पहाटे २ वाजून १० मिनिटांनी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
( हेही वाचा: आंध्र प्रदेशात चंद्रबाबू नायडूंच्या रॅलीत चेंगराचेंगरी; 8 जणांचा मृत्यू )
मुंबईत गोवरची संख्या ५३१ पर्यंत
मुंबईत गोवर गेल्या दोन आठवड्यांपासून नियंत्रणात येत आहे. बुधवारी गोवरचे ४ नवे रुग्ण सापडले आहे. मुंबईत ३२ संशयित गोवरचे रुग्ण सापडल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने केली. तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत असल्याचेही पालिका आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community