Swiggy ला मोठा धक्का! ९०० रेस्टॉरंट होणार डिलिस्ट; ग्राहकांची सवलतही बंद

127

भारतातील जवळपास ९०० रेस्टॉरंट्सनी स्विगी डाईनआऊटमधून स्वत:ला डिलिस्ट करण्यासाठी नोटिसा पाठवल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. Swiggy Dineout वरून ग्राहकांना अनेक सवलती दिल्या जातात. Swiggy Dineout या अ‍ॅपद्वारे अनेक ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सूट मिळते यामुळे रेस्टॉरंटचा डाईन-इन बिझनेस पूर्णपणे बिघडेल अशी भिती रेस्टॉरंट चालकांना आहे. जेव्हा एखादे रेस्टॉरंट या अ‍ॅपवर नोंदणी करतात तेव्हा स्विगी, झोमॅटोसारखे अ‍ॅप्स मोठ्या प्रमाणात कमिशन आकारतात आणि ग्राहकांना खाद्यपदार्थ आणि पेयांवर मोठ्या प्रमाणात सूट मिळते. यामुळेच आता रेस्टॉरंटने Swiggy Dineout वरून डिलिस्ट करण्यासाठी नोटीस केली आहे.

( हेही वाचा : Sunday Megablock : रविवारी बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या मेगाब्लॉक अपडेट!)

स्विगीकडून स्पष्टीकरण

स्विगी डाईनआऊट रेस्टॉरंट स्वत:च्या भागीदारांना स्वत:च्या सवलती ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देते. रेस्टॉरंट डिलिस्ट करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. मात्र या परिस्थितीला कसे सामोरे जाता येईल यासाठी आम्ही एनआरएआयच्या प्रतिनिधींशी चर्चा करत आहोत असे स्पष्टीकरण स्विगीच्या प्रवक्त्यांनी दिले आहे.

सवलत मिळू शकत नाही

डिलिस्ट केल्यावर रेस्टॉरंट स्विगीच्या सर्चमध्ये दिसेल परंतु ग्राहक रेस्टॉरंटमध्ये जाऊन त्याच्यांकडून सवलत किंवा कॅशबॅक सुविधा घेऊ शकत नाहीत. Dineout सुविधा जवळपास २० शहरांमध्ये एकूण १५ हजार रेस्टॉरंटमध्ये कार्यरत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.