आतापर्यंत तुम्ही असे ऐकले असेल की, बेरोजगार असल्याने किंवा आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने काही लोकांनी चोरी करण्याचा मार्ग निवडला आणि चोरी करून पैसा मिळवला. पण कोणत्या उच्च शिक्षित व्यक्तीने चोरी केल्याचे कधी ऐकले आहे का? हे अतिश्योक्ती वाटत असले तरी हे सत्य आहे. सध्या नागपुरात एका उच्चशिक्षित चोर तरूणीची जोरदार चर्चो आहे. डोळ्याची पापणी लवताच ही तरूणी मोठं घबाड लंपास करते, असे सांगितले जात आहे. नागपुरात गेल्या काही वर्षांपासून धुमाकूळ घालणाऱ्या या तरूणीला तपास यंत्रणा देखील हैराण झाली होती. अखेर या तरुणीला अखेर पोलिसांनी पकडले. त्यांनी चौकशीत तिच्याकडून चोरीचे प्रात्यक्षिक करवून घेतले अन् तिची हातसफाई पाहून पोलीसही चक्रावले.
डबल एम.ए. अन् चोरीत पीएच.डी
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात राहणारी ही तरुणी अवघी २७ वर्षांची आहे. घरची आर्थिक स्थिती सधन आहे. तसेच ती डबल एम.ए. झालेली आहे. काही वर्षांपूर्वी तिला चोरीची सवय लागली अन् तिने शहरात धुमाकूळ सुरू केला. गर्दीच्या ठिकाणी महिलेच्या पर्समधून रोख, दागिने लंपास करण्याचा ती सराईत होती. सारखेच गुन्हे वारंवार घडत असल्याने पोलीसही हैराण झाले होते. तिने अशा प्रकारे तब्बल २० चोऱ्या केल्या असून तब्बल २० लाखांचे सोने देखील तिने घरातील डब्यात भरून ठेवले होते.
(हेही वाचा – धक्कादायक! स्वत:च्याच श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून जोडप्याची आत्महत्या)
आठ वर्षापूर्वी तिला मिळाला चोरीचा गुरुमंत्र
होस्टेलमध्ये राहणाऱ्या एका उच्चभ्रू तरुणीने तिला आठ वर्षापूर्वी चोरीचा गुरुमंत्र तिला तिच्या मैत्रिणीने दिला होता. काही महिने तिच्यासोबत चोरी केल्यानंतर हिस्सेवाटणीवरून त्या दोघीत वाद झाला अन् हिने नंतर स्वतंत्र चोरी करण्यास सुरूवात केली. पोलिसांनी काही दिवसांपूर्वी तिला पकडले तेव्हा तिला चोरीचा नाद असल्याचे उघड झाले. उच्चशिक्षित आहे, चांगल्या घरची आहे, मग कशाला चोऱ्या करते, असा प्रश्न तिला पोलिसांनी केला. यावर उत्तर देताना ती म्हणाली, ‘आप ये नहीं समझेंगे’. ती चोरटी’ असल्याचे लक्षात आल्याने तिचे जुळलेले लग्नही यापूर्वी मोडले असल्याचेही पोलिसांच्या माहितीतून समोर आले.
Join Our WhatsApp Community