अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची धमकी देऊन बलात्कार, लेखिकेचा आरोप

91
७५ वर्षांच्या व्यावसायिकाने दाऊद इब्राहिम याची भीती घालून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका ३५ वर्षीय लेखिकेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. या व्यावसायिकाने आपल्याकडून २ कोटी रुपये देखील घेतले असून ते देखील परत न केल्याचा दावा या लेखिकेने केला आहे.

पीडितेने तक्रारीत काय म्हटलेय?

या प्रकरणी आंबोली पोलीसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी हा गुन्हा अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे बलात्काराच्या गुन्ह्यात प्रथमच नाव आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
तक्रार दाखल करणारी ३५ वर्षीय पीडिता ही चित्रपट लेखिका आहे. मूळची हरियाणा राज्यातील असणारी पीडिता ही २००७ मध्ये मुंबईत आली होती. दादर येथे राहणारे ७५ वर्षीय व्यावसायिक हे तीचे दूरचे नातलग आहेत. २००७ मध्ये पीडित लेखिका आणि व्यावसायिक असणारे गृहस्थ यांच्यात अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये  दोघांच्या मर्जीने लैगिंक संबंध जुळून आले होते. त्यानंतर दोघांमध्ये आर्थिक व्यवहारदेखील झाला होता, असे पीडितेने आंबोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पीडितेने व्यावसायिक असलेल्या ७५ वर्षांच्या नातलग असणाऱ्या व्यक्तीला २ कोटी रुपये व्याजाने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मागील काही वर्षांपासून ही व्यक्ती पैशाचे व्याजदेखील देत नाही व पैसेदेखील परत करत नसल्याचा दावा पीडित लेखिकेने तक्रारीत केला आहे.

पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला 

व्यावसायिकाने आपल्यावर वारंवार बलात्कार करून याची वाच्यता न करण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी दिल्याचे म्हटले आहे. दाऊदसोबत आपले थेट संबंध असून, हाजी मस्तान हा देखील माझ्या पत्नीचा मेहुणा असल्याची धमकी व्यावसायिकाने दिल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. आंबोली पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार आणि धमकीचा गुन्हा दाखल केला असून, हा प्रकार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्यामुळे गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

तपास सुरु 

गुन्ह्याचे कागदपत्रे आमच्याकडे आली असून पीडिता आणि तिने आरोप केलेली व्यक्ती एकमेकांचे नातलग आहेत दोघांमध्ये आर्थिक व्यवहार आहेत, आम्ही पीडितेचा पुन्हा एकदा जबाब नोंदवून घेणार असून दाऊदचे कुणाशी काय संबंध आहेत हे तपासले जाणार असल्याचे, एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.