श्वास घेताना त्रास होत असल्याने तब्ब्ल सात वर्ष शांत झोपेसाठी आसूसलेल्या ७७ वर्षीय वृद्धावर वांद्रे येथील खासगी रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले. ७७ वर्षीय गोपाल यांना मिट्रल वोलव्ह रिगग्रीटेशन हा हृदयाशी संबंधित दुर्मिळ आजार होता. या आजाराबाबत फारशी चर्चा केली जात नाही. माहितीच्या अभावामुळे रुग्ण आजाराचे निदान आणि उपचारांपासून वंचित राहतो असे डॉक्टरांनी सांगितले.
या आजाराचे प्रमाण आता वाढू लागले आहे. जगभरातील दोन टक्के रुग्णांना हा आजार बळावला आहे. या आजारात हृदयाकडून शरीरात जाणाऱ्या रक्त प्रवाहाकडे अडथळा निर्माण होतो. रुग्णाला झोप येत नाही. कित्येकदा रुग्ण खुर्चीवर बसून झोपतात. वेळीच उपचार न झाल्यास हृदयाचे स्नायू कमकुवत होतात. वयोमानाने हा त्रास वाढत जातो आणि हृदयाला मोठा त्रास होण्याची भीती बळकावते.
(हेही वाचा – केईएम पाठोपाठ आता शेजारच्या ‘या’ रुग्णालयातही हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरु होणार)
गोपाल यांना मिट्रल वोलव्ह रिगग्रीटेशन आजाराचे निदान होताच डॉक्टरांनी त्यांच्यावर मिट्राक्लिप प्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. रुग्णाच्या शरीरात केथेटर घालण्यात आला. कॅथेटर रुग्णाच्या उजव्या हृदयापासून डाव्या बाजूकडे फिरवण्यात आला. त्यानंतर एक क्लिप घातल्यानंतर रक्त प्रवाह सुरळीत झाला. या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण पलंगावर झोपू लागला. तीन दिवसानंतर रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community