विद्यार्थिनीचा विनयभंग, स्कूल व्हॅन चालकाला अटक

174

एका शाळकरी विद्यार्थीनीचा स्कूल बस व्हॅन चालकाने विनयभंग केल्याची घटना मुलुंड पश्चिम येथे घडली. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी व्हॅन चालकाविरुद्ध विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पालकवर्गात संतापाचे वातावरण पसरले आहे.

( हेही वाचा : गोवंडीत बाळांचे मृत्यूसत्र सुरुच, संशयित गोवरबाधित मृत्यूंची संख्या वाढली )

पीडित विद्यार्थिनी ९ वर्षांची असून मुलुंड पश्चिम येथील एका खाजगी शाळेत ४ थी इयत्तेत शिकत आहे. पीडित विद्यार्थिनी खाजगी स्कूल व्हॅनने शाळेत जात येत होती. गुरुवारी नेहमी प्रमाणे सायंकाळी शाळा सुटल्यावर पीडित तरुणी ही खाजगी व्हॅनने घरी येत असताना वाहन चालकाने सर्व विद्यार्थ्यांना घरी सोडले व सर्वात शेवटी उरलेल्या ९ वर्षाच्या पीडित विद्यार्थ्यांनी चालकाचा शेजारील आसनावर बसलेली असताना चालक सूरज भालेराव याने सर्वोदय नगर ते मुलुंड कॉलनीच्या दरम्यान पीडित विद्यार्थिनीच्या शरीरावरुन हात फिरवू लागला होता.

या सर्व प्रकारणामुळे विद्यार्थिनी घाबरली होती, तिने चालक सूरज याला विरोध देखील केला, मुलीच्या विरोधानंतर घाबरलेल्या चालकाने याबद्दल घरी सांगू नको असे बोलून तिला धमकी दिली, व विद्यार्थिनीला सोडनू घाईघाईने निघून गेला. घरी आल्यावर मुलगी गप्प गप्प असल्यामुळे आईने तिच्याकडे चौकशी केली असता तिने व्हॅनमध्ये तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. आईने तात्काळ मुलुंड पोलीस ठाणे गाठून व्हॅन चालक सूरज भालेराव याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी वाहन चालक सूरज भालेराव याच्या विरुद्ध विनयभंग, धमकी देणे आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथमिरे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.