अफगाणिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले!

96

अफगाणिस्तान येथील काबूलमध्ये कर्ते परवान गुरूद्वाराजवळ बुधवारी, पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने गुरूद्वार हादरल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरूद्वाराच्या मुख्य गेटजवळ हा बॉम्बस्फोट झाला असून गेल्या महिन्यातही या गुरूद्वाराला लक्ष्य करण्यात आले होते. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या हिंदू नागरिकांच्या मनात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या बॉम्बस्फोटात गुरूद्वाराच्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यापूर्वीही झाला होता बॉम्बस्फोट 

आफगाणिस्तानात तालिबानी सरकार आल्यापासून हे प्रकार वाढले असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. बॉम्बस्फोट होत असल्याने येथील हिंदू आणि शीख समुदायातील नागरिकांनी आता भारताचा रस्ता धरला असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या महिन्यात 18 जून रोजी काबूलमधील कर्ते परवान गुरूद्वारच्या मुख्य गेटजवळ हा बॉम्बस्फोट झाला होता. त्यावेळी त्यामध्ये दोन जणांनी आपला जीव गमवावा लागला होता.

(हेही वाचा – Indian Railways : रेल्वेच्या ‘या’ FREE सेवांबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या!)

शिखांना हाकलून देण्याचा प्रयत्न

गुरुद्वारावर झालेला हल्ला हा दहशतवाद्यांकडून तेथील उर्वरित शिखांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. बुधवारी गुरुद्वाराच्या दरवाजाजवळ असलेल्या दुकानांच्या बाहेर बॉम्बचा स्फोट झाला. यामुळे अनेक दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. इस्लामिक स्टेट खोरासानने 18 जून रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली होती. यापूर्वी तालिबानी दहशतवादी आणि इतर दहशतवादी संघटनांनी अल्पसंख्याकांना इशारे दिले होते. ज्यामध्ये शीख आणि हिंदू समुदायाच्या लोकांनी अफगाणिस्तान सोडावे किंवा त्यांनी इस्लाम स्वीकारावा असे म्हटले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.