नवी मुंबईत अंदाधूंद गोळ्या झाडत दिवसाढवळ्या बिल्डरची हत्या

नवी मुंबईतील प्रसिद्ध बिल्डरचा दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. नवी मुंबईत थरकाप उडवणारी घटना घडली आहे. अज्ञात इसमांनी नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक साऊजी मंजिरी यांचा दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून केला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?

साऊजी मंजिरी हे इम्पिरिया ग्रुपच्या पाच पार्टनरपैकी एक होते. ते 65 वर्षांचे होते. नवी मुंबईतील नेरुळ परिसरात संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास काही कामासाठी ते कारने निघाले होते. त्यावेळी सेक्टर सहा इथे दोन मोटारसायकलस्वार त्यांच्या कारला आडवे आले आणि काही कळायच्या आतच त्यांनी बेधूट गोळीबार केला. साऊजी यांना गोळ्या लागल्या आणि ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

( हेही वाचा: बारावीचा केवळ गणिताचा नव्हे तर ‘या’ दोन विषयांचेही फुटले पेपर )

पोलिसांकडून पुढील तपास सुरु

गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त अमित काळे, उपायुक्त पानसरे यांच्यासह गुन्हे शाखेचे अधिकारी आणि नेरुळ पोलीस ठाण्याचे पीआय यांनी घटनास्थळाची पाहणी केली. जमीन, मालमत्ता किंवा एखाद्या आर्थिक व्यवहारातून हा खून झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून साऊजी यांच्यावर कोणी गोळीबार केला याचा शोध पोलीस घेत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here