जगात हलाल ही संकल्पना हळूहळू फोफावत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर ती आक्रमण करु पाहत आहे. हलालचे पैसे अतिरेक्यांकडे जात असून, आपण McDonald मधून खरेदी केलेला एक बर्गर एका दहशतवाद्याला पोसत आहे आणि तोच दहशतवादी पुढे जाऊन आपल्या घरात घुसून आपल्या पुढच्या पिढीची हत्या करणार आहे. म्हणूनच हलाल सक्तीविरोधात आपण आवाज उठवणे गरजेचे असून, हलाल प्रमाणपत्र असलेल्या वस्तूंचा बहिष्कार करणे आवश्यक असल्याचे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक व हिंदू जनजागृती समितीच्यावतीने दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हलाल सक्तीविरोधी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षे यांनी एका चित्रफितीच्या माध्यमातून आपले विचार मांडले.
हलाल सर्टिफिकेट नावाचे वादळ
शरद पोंक्षे म्हणाले की, जगात आणि देशात येत्या काळात हलाल सर्टिफिकेट नावाचे वादळ येणार आहे, किंबहुना त्या वादळाची सुरुवात झाली आहे. हलाल प्रमाणपत्र नसेल तर तुमची वस्तू बाजारात विकत घेतली जाणार नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे आपल्या वस्तूची खरेदी वाढावी आणि आपल्याकडे पैसा यावा यासाठी व्यापारी या हलाल प्रमाणपत्राला आपल्या वस्तूंवर लावत आहेत आणि यातून भारतीय अर्थव्यवस्थेला समांतर अशी एक अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे.
( हेही वाचा: हलाल विरोधातील लढाई आता सुरु, परिणाम दिसताेय – माजी खासदार डॉ. विजय सोनकर शास्त्री )
वेळीच सावध होणे गरजेचे
हे हलाल सर्टिफिकेट आपल्या वस्तूंवर लावण्यासाठी व्यापारी एक ठराविक रक्कम मोजतो. त्यानंतर त्याला हे हलाल सर्टिफिकेट दिले जाते. परंतु यातून मिळणा-या पैशाचा वापर हा जगभरात आंतकवाद पसरवण्यासाठी केला जातो. भारत तर 75 वर्षे आतंकवादामुळे होरपळून निघाला आहे. भारत अर्थव्यवस्थेतील 40 ते 45 टक्के रक्कम पाकिस्तानमधून येणा-या दहशतवाद्यांशी लढण्यात घालवत आहोत. त्यामुळे आपण वेळीच सावध व्हायला हवे. या हलाल प्रमाणपत्रावर बंदी घालायला हवी, किंबहुना हलाल प्रमाणपत्र असलेल्या वस्तू खरेदी करु नयेत.
Join Our WhatsApp Community