Madhya Pradesh Bus accident: मध्य प्रदेशातील धारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून पुण्याला जाणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच, मदत व बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बसला क्रेनच्या सहाय्याने नदीबाहेर काढण्यात आले आहे.
एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही जळगावमधील अमळनेर येथे येणार होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, एसटीचे अधिकारीदेखील घटनास्थळी रवाना झाले आहेत.
( हेही वाचा: जम्मू- काश्मिर: ग्रेनेड स्फोटात 2 जवान हुतात्मा )
खरगोन के खलघाट में बस के खाई में गिरने से हुई दुर्घटना का दुखद समाचार प्राप्त हुआ।
ईश्वर से दिवंगत आत्माओं को अपने श्रीचरणों में स्थान और परिजनों को यह गहन दु:ख सहन करने की शक्ति देने तथा घायलों के शीघ्र स्वस्थ होने की प्रार्थना करता हूं।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) July 18, 2022
काय घडलं नेमकं
महाराष्ट्र सरकारची बस सकाळी 7 च्या सुमारास इंदूरवरुन जळगावकडे जात होती. इंदूरमध्ये 12 प्रवासी चढले. बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने, बस नर्मदा नदीवरील ब्रीजवरुन खाली कोसळली. आतापर्यंत 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे. या बसमध्ये 50 ते 55 प्रवासी होते, अशी माहिती आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.