मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर कार आणि ट्रकचा भीषण अपघात

141

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भरधाव कारची ट्रकला मागून जोरदार धडक बसली असून, कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुण्याकडून मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला. मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवरील गहुंजे येथे हा भीषण अपघात झाला आहे. अपघाताची भीषणता इतकी होती की, यात कारमधील चारही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी हायवे पोलीस दाखल झाले असून, मृतदेह काढण्याचे काम सुरु आहे.

( हेही वाचा: धक्कादायक! एकाच वेळी 6 मैत्रिणींनी विषं खाल्लं, कारण वाचून थक्क व्हाल )

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल

शनिवारी दुपारी द्रुतगती मार्गावरील गहुंजे येथे पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. कारने ट्रकला पाठीमागून धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अन्य प्रवाशांनीच पोलिसांना अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच हायवे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने मृतदेहांना कारमधून काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.