विम्याचे पैसे लाटण्यासाठी तिने असा केला बनाव…

149

पतीचा अपघाती मृत्यु झाला असल्याचे कागदपत्रे सादर करून विम्याचे २५ लाख रुपये लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दाम्पत्याविरुद्ध विमा कंपनीने मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दाम्पत्याविरुद्ध खोटी कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे दाम्पत्य पुण्यात राहणारे असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

२५ लाख रुपयांचा अपघाती लाभ

प्रकाश माने आणि मयुरी माने असे या दाम्पत्याचे नाव आहे. हे दाम्पत्य पुणे जिल्ह्यातील हडपसर या ठिकाणी राहत आहे. प्रकाश माने हे पुण्यातील मगरपट्टा येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करतात, त्यांनी जानेवारी महिन्यात कोटक लाईफ इन्शूरन्स कंपनीच्या वेबसाईटवरून ऑनलाइन २५ लाख रुपयांचा मृत्युलाभ अतिरिक्त अपघाती लाभ विमा खरेदी केला होता व पत्नीला वारस केले होते.

(हेही वाचा McDonald मध्ये खरेदी केलेला एक बर्गर तुमच्या पुढच्या पिढीची करणार हत्या- शरद पोंक्षे)

सर्व बनावट कागदपत्रे बनवली

१५ मार्च रोजी मयुरी मोरे हिने विमा कंपनीकडे पतीचा अपघाती मृत्यु झाल्या प्रकरणी विम्याच्या रकमेसाठी दावा केला होता. मयुरी मोरेने विमा कंपनीकडे पती प्रकाश मोरे यांचा मृत्यू दाखला, सासवड पोलीस ठाण्यातील कागदपत्र, शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस पाटील यांचा दाखला इतर कागदपत्रे सादर केली होती. कागदपत्राची खात्री करण्यासाठी मुंबईतील दावा विभागाकडे ही कागदपत्रे पाठविण्यात आली होती. कोटक लाईफ इन्शुरन्सच्या मालाड येथील ही कागदपत्रे तपासली जात असताना ही कागदपत्रे बनावट असल्याचे दावा विभागाच्या चौकशीत समोर आली आणि विमा धारक प्रकाश मोरे हे मृत नसून जिवंत असल्याचे समोर आले, कंपनीची फसवणूक केल्या प्रकरणी विमा कंपनीने दिंडोशी पोलीस ठाण्यात या दाम्पत्याविरुद्ध तक्रार केली असून पोलिसांनी फसवणूक आणि बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही बनावट कागदपत्रे, पोलिसांचा पंचनामा, शवविच्छेदन अहवाल एफआयआरची प्रत कोणी बनवून दिली, याप्रकरणी तपास सुरू असून यामध्ये 2 आणखी आरोपी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.