पुण्यात इलेक्ट्रिक बसेससाठी अत्याधुनिक चार्जिंग स्टेशन

पुणे शहर तसेच उपनगरांतील रस्त्यांवर प्रदूषणात घट होण्यासाठी आणि पर्यावरणपूरक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक बसेस जास्त प्रमाणात वापरात आणण्याचे पुणे महापालिकाचे धोरण आहे. परंतु, अशा बसेसची तातडीने चार्जिंग होणेही गरजेचे आहे. अपुऱ्या चार्जिंगच्या अभावी सिंहगडावर सुरू करण्यात आलेली ई-बस सेवा स्थगित करावी लागली होती. याच पार्श्वभूमीवर अशा ई-बसेससाठी मांजरी बुद्रुक- शेवाळेवाडी येथील पीएमपीच्या बस डेपोत इलेक्ट्रिक बसेससाठी अत्याधुनिक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहे. तसेच इलेक्ट्रिक बसेस बरोबरच खासगी ई-वाहनांनाही याठिकाणी चार्जिंग करता येईल, असे नियोजन आहे.

( हेही वाचा : Flying रेस्टॉरंटचा ट्रेंड…हवेत उडताना घ्या खाण्याचा आनंद)

अत्याधुनिक चार्जिंग स्टेशन

पुणे शहर आणि उपनगरात सध्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बसेस धावत असून लवकरच त्यांची संख्या वाढणार आहे. त्यातील अधिकाधिक बसेस या उपनगरांत धावणार आहेत. अशा बसेस केवळ अर्ध्या तासात चार्जिंग कशा करता येतील यासाठी अद्ययावत असे चार्जिंग स्टेशन शेवाळेवाडी येथील डेपोत उभारण्याचे नियोजन आहे. याशिवाय खासगी वाहनांनाही येथे आपले ई-वाहन चार्जिंग करता येईल का, असेही नियोजन आहे. पालकमंत्री अजित पवार आणि आमदार चेतन तुपे यांच्या निधीतून हा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here