जत्रेत 50 फूट उंचीवरुन पाळणा खाली कोसळला, घटनेचा थरारक व्हिडीओ व्हायरल

128

पंजाबमधील जत्रेत एक मोठा अपघात घडला आहे .मोहाली येथील एका जत्रेत 50 फूट उंचीवरुन पाळणा खाली कोसळून मोठा अपघात झाला आहे. मोहाली शहरातील फेड आठ येथील दसरा ग्राऊंड येथे जत्रेतील पाळणा खाली कोसळला. या दुर्घटनेमध्ये 16 जण जखणी झाले आहेत. अपघाताच्यावेळी पाळण्यामध्ये 30 हून अधिक जण बसले होते. दरम्यान, जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या जास्त आहे. पाळणा जमीनीवर आदळला, त्यामुळे या अपघातात लोकांच्या मान आणि पाठीला दुखापत झाली आहे. अपघातानंतर पाळण्याचा ऑपरेटर आणि त्याच्या कर्मचा-यांनी तेथून पळ काढला. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

( हेही वाचा: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, शिवतीर्थावर दसरा मेळाव्याचा मान कोणाला? )

पाळणा कोसळल्याने अनेकजण जखमी 

पंजाब येथील मोहली शहरात रविवारी ही घटना घडली. मोहालीमधील दसरा ग्राऊंड येथील जत्रेमध्ये हा अपघात घडला. दसरा ग्राऊंड येथे जत्रा भरली होती. रविवार असल्याने जत्रेमध्ये नागिरकांची खूप गर्दी होती. यावेळी हा अपघात घडला. जत्रेतील ड्राॅप टाॅवर पाळणा 50 फूट उंचीवरुन अतिशय वेगाने खाली कोसळला. यावेळी सुमारे 30 जण पाळण्यामध्ये बसलेले होते. अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.