गोरेगाव येथे इमारतीच्या सातव्या मजल्याला आग

114

गोरेगाव पूर्व येथील इमारतीच्या सातव्या मजल्याला सोमवारी रात्री आग लागली. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी चार बंब व तीन फायर इंजिन पाठवण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

गोरेगाव पूर्व येथील मोहन गोखले मार्गावरील गोकुळधाम जवळील धीरज व्हॅली इमारत क्रमांक दोनच्या सातव्या मजल्यावर आग लागली होती. ही इमारत तळ मजला अधिक सात अशी असून याबाबतची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

( हेही वाचा: ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणारे भारतीय ‘ऋषी’ आहेत तरी कोण? )

आग लागल्याचे कारण अस्पष्ट 

याबाबत महापालिका नियंत्रण कक्षाला विचारले असता, रात्री साडे नऊच्या सुमारास आग लागल्याचे समजले. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. तसेच, आगीमुळे कोणीही जखमी झाल्याबाबत अद्याप कोणतीही माहिती नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.