रायगडमधील मोठे बंदरावर जय भवानी नावाच्या मच्छीमारी नौकेने रविवारी दुपारी अचानक पेट घेतला. यात ही बोट जळून खाक झाली. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण तोपर्यंत बोटीचे मोठे नुकसान झाले होते.
आग नियंत्रणात आणण्यात यश
मोठे बंदरावर नारायण मुंबईकर यांची जय भवानी नावाची फायबर मच्छीमारी बोट नांगरुन ठेवली होती. दुपारच्या सुमारास बोटीने अचानक पेट घेतला. आगीची माहिती मिळताच मोठे बंदर भागातील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. पण यात बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
( हेही वाचा: दोन महिन्यांनी पुन्हा विजसंकट? )
Join Our WhatsApp Community