२६/११ हल्ल्याच्या भयाण आठवणी आजही १३ वर्षांनंतर कायम स्मरणात आहेत. कामा रुग्णालयात कसाब आणि त्याचे साथीदार गोळीबार करत असतानाच, एका मुलीचा जन्म झाला, तिचे नाव ‘गोली’असे ठेवण्यात आले. तिचे खरे नाव तेजस्विनी आहे. गोलीचे कुटुंबीय तिचा वाढदिवस साजरा न करता या दिवशी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांचे स्मरण करतात.
गोळीबाराच्या आवाजात झाला जन्म
दहशतवाद्यांनी समुद्रीमार्गे प्रवेश करत, ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कामा रुग्णालयात गोळीबार केला, अशा नाजूक परिस्थितीत गोलीचा जन्म झाला. सीएसएमटी स्थानकावर सर्वत्र हल्ल्याची चर्चा सुरू असताना मला प्रसुती वेदना होत होत्या, रुग्णालयात डॉक्टर, नर्सची धावपळ सुरू होती. बॉम्बस्फोट, गोळीबाराच्या आवाजातच माझ्या मुलीचा जन्म झाला, यामुळे तिचे नाव ‘गोली’ ठेवण्यात आले, तर काही लोक तिला ‘AK-47’ असेही म्हणतात, अशा शब्दांत गोलीची आई विजू चौहान आजही आठवणी सांगतात.
( हेही वाचा : 26/11…का ट्रेंड होत आहे ट्विटरवर ‘हिंदू टेरर’? )
धैर्य दाखवले
२६/११ च्या हल्ल्यादरम्यान प्रत्येकाने धैर्य दाखवले. कामा रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टरांनी सर्व रुग्णांचा धैर्याने बचाव केला. सीएसएमटी स्थानकावरील अनेक महिलांनी स्वत:चे रक्षण करण्यासाठी कामा रुग्णालयाची वाट धरली. अशा कठीण परिस्थितीवर सर्व कर्मचारी, परिचारिकांनी एकत्र येऊन मात केली.
Join Our WhatsApp Community