युपीच्या चित्ररथाद्वारे काशी विश्वनाथाची झलक, बघा फोटो

95

देशाच्या 73 व्या प्रजासत्ताक दिन समारंभात राजपथावर 12 राज्यांचे चित्ररथ सहभागी झाले होते. त्यापैकी उत्तरप्रदेशच्या चित्ररथातून काशी विश्वनाथ धामची झलक दाखवण्यात आली आहे. यामध्ये प्राचीन शहरांचा गौरवशाली इतिहास आणि संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात आले.

राजपथावर 12 राज्यांच्या चित्ररथांचे दर्शन

यंदा राजपथावर 12 राज्यांच्या चित्ररथांचे दर्शन झालं. यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, छत्तीसगढ, मेघालय, गुजरात, गोवा, हरियाणा, उत्तराखंड, कर्नाटक, हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या चित्ररथांचा समावेश होता. आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या चित्ररथांची निवड करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण 12 राज्यांच्या चित्ररथांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड या राज्यांच्या चित्ररथांचा समावेश आहे. तर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडलेल्या पोशाखामध्येही उत्तराखंडची पारंपारिक टोपी आणि मणिपूरमध्ये वापरत असलेला स्टोल (उपरणं) घातला आहे. याशिवाय उत्तराखंडचे राज्य फूल असलेल्या ब्रम्हकमळाच्या आकाराचा मास्क नरेंद्र मोदी यांनी घातला आहे.

(हेही वाचा – जवानांनी 15 हजार फुटांवर फडकवला तिरंगा)

UP

राजपथावरील उत्तर प्रदेशच्या चित्ररथातून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याची उत्पादने दाखवण्यात आली आहेत. त्यामध्ये पारंपारिक कलाकुसर, विणकर आणि हस्तकलेच्या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेचा वेगही दिसून येतो. काशी विश्वनाथ धामचा गौरवशाली इतिहास चित्ररथाच्या मागील भागात प्रदर्शित करण्यात आला आहे. वाराणसी शहर वरुणा आणि अस्सी या दोन नद्यांनी बनले आहे. मोक्षदायिनी गंगेच्या पश्चिम तीरावर वसलेल्या या शहराच्या मध्यभागी वसलेल्या काशी विश्वनाथ धाममध्ये भगवान विश्वेश्वराचे ज्योतिर्लिंग पूजनीय आहे. उत्तर प्रदेशमधील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग धोरण आणि औद्योगिक विकास धोरणावर आधारित ODOP कार्यक्रमांतर्गत कौशल्य विकास आणि रोजगाराची उपलब्धी उत्तर प्रदेशच्या चित्ररथातून दाखवण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.