“कोणाक होय नी कोणाची सोय” नाटकातून मालवणी जीवनशैलीचे दर्शन

कामगार कल्याण केंद्र बदलापूर यांच्या विद्यमाने, सावित्री रंभा कलामंच संस्था बदलापूर निर्मीत दोन अंकी विनोदी मालवणी नाटक कोणाक होय नी कोणाची सोय हे 10 डिसेंबर 2022 ला सायंकाळी 7 वाजता कल्याण भवन, विक्रोळी येथे सादर केले जाणार आहे. तसेच, या नाटकासाठी प्रवेशही विनामूल्य असणार आहे.

मालवणी लोकांची जीवनशैली, त्यांच्या जगण्यातील साधेपणा या नाटकातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच, अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवण्याचा संदेशही या नाटकातून देण्यात आला आहे. रोजच्या दगदगीच्या जीवनातून थोडा वेळ खळखळून हसण्यासाठी हे नाटक विनोदी सादर केले जाणार आहे.

( हेही वाचा: ‘FY’ ला ऍडमिशन घेताय? मतदार नोंदणी केलीत ना? )

प्रवेश विनामुल्य

या नाटकाचे लेखन राहुल कदम यांनी केले आहे. तर दिग्दर्शन राहुल कदम आणि प्रसन्न कदम यांच्याकडून करण्यात आले आहे. तसेच, या नाटकासाठी प्रवेश विनामुल्य असल्याने, रसिकांना मालवणी भाषेतला गोडवा विनोदी रुपात लुटता येणार आहे.

प्रयोगासाठी संपर्क:

राहुल कदम+91 95795 19638
पंकज परब +91 9152085418

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here