अँटॉप हिल परिसरात घर कोसळलं, ९ जण बचावले, रूग्णालयात उपचार सुरू

अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू

मुंबई येथील अँटॉप हिल परिसरात सायन कोळीवाडा कोकरी आगर, जय महाराष्ट्र नगर झोपडपट्टीत ३ घरे कोसळली आहेत. मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या घराचे स्वरूप G+2, G+2, G+1 असे होते. अचानक ही घर कोसळ्याने परिसरातील सर्व नागरिकांची धावाधाव सुरू झाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग आणि अँटॉप हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोसळलेल्या घरातूनअडकलेल्या ९ जणांना सुखरूप बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल होत या घटनेत ९ जणांना बचावण्यात अग्मिशमन दलाला यश आले आहे. या प्रकरणाचा तपास अँटॉप हिल पोलीस करत आहेत.

जखमींवर उपचार सुरू

या घटनेतीस जखमी झालेल्यांना सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोसळलेल्या या तिन्ही घरांमध्ये रेशन दुकान, भंगार दुकान आणि मिठाचे दुकान होते. रेशन दुकानावर दुरुस्तीचे काम चालू होते. रेशन दुकानाच्या वरती दोन घरे होती. तर या रेशन दुकानाच्या वर भंगारची २ घरे होती आणि मिठाच्या दुकानाच्या वर १ घर होते. या घटनेत ९ जणांना अग्निशमन दलाकडून रेस्क्यू करण्यात आले आहे. त्यापैकी ७ जणांना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तर ३ जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यांची नावे खालील प्रमाणे.

1) अमित मिश्रा (वयवर्ष २३)
2) सुरेंद्र मिश्रा (वयवर्ष ५९)
3) पुनम श्रमा, (वयवर्ष २८)

(हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांनी शासन निर्णय फेटाळला! संप चिघळला)

अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू

असेही सांगितले जात आहे की, अँटॉप हिल परिसरातील जय महाराष्ट्र नगर येथे गोडाऊनचे काम सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेच्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here