पश्चिम उपनगरातील कांदिवली पश्चिम येथील ‘हंसा हेरिटेज’ इमारतीच्या १४ व्या मजल्यावर शनिवारी रात्री भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सात गाड्या दाखल झाल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. रात्री साडेदहा वाजेपर्यंत पाच रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीतील दोन जखमी झालेल्या रहिवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पणतीमुळे लागली आग
कांदिवली पश्चिम येथील मथुरादास रोडवर हंसा हेरिटेज ही पंधरा मजल्याची इमारत असून चौदाव्या मजल्यावर ही आग लागली. दिवाळीसाठी लावलेल्या पणतीमुळे घराच्या पडद्याने पेट घेतला. त्यातून ही आग वाढत गेली अशी माहिती येथील रहिवाशांनी दिली. इमारतीच्या खिडक्यांमधून आगीच्या ज्वाला बाहेर येत होत्या. एकूण सात जणांपैकी पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर, राजाबेन पारेख व निता पारेख या दोन ज्येष्ठ नागरिकांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
कांदिवली (पश्चिम) च्या मथुरादास मार्गावरील हंसा हेरिटेज बिल्डिंगला लागलेल्या आगीच्या घटनेची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व उपमहापौर सुहास वाडकर यांनी आज दिनांक ०६ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहणी करून आगीच्या सद्यस्थितीची माहिती अग्निशमन अधिकाऱ्याकडून घेतली. pic.twitter.com/8ox50BWFPy
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) November 6, 2021
(हेही वाचा- “पालिकेमध्ये वीरप्पन गॅंग सक्रिय”, मनसे करणार पर्दाफाश)
महापौरांनी केली पाहणी
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व उपमहापौर सुहास वाडकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. आगीच्या सद्यस्थितीची माहिती अग्निशमन दल अधिकाऱ्याकडून घेतली.
Join Our WhatsApp Community