अंधेरी पश्चिमेतील प्राईम मॉलमध्ये अग्नितांडव

अंधेरीतील विलेपार्ले येथील प्राईम मॉलला सकाळी साडे दहा वाजता आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 10-12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिम येथील प्राईम मॉलला लेवल ४ ची भीषण आग लागली. अल्फा इरला रोडवर प्राईम मॉल असून कूपर हॉस्पिटल या मॉलच्या बाजूला आहे. दरम्यान, या मॉलला आग लागल्यानंतर घटनास्थळावर आतापर्यंत अग्निशमन दलाच्या जम्बो टँकर 07, फायर इंजिन 10, श्वसन उपकरण वाहन 01, कंट्रोल पोस्ट 01 एवढे दाखल झाल्याची माहिती आहे.

(हेही वाचा- एसटीचे सरकारीकरण नव्हे तर खासगीकरण?)

आगीचे कारण अस्पष्ट

यावेळी मॉलमध्ये भीषण अग्नितांडव पाहायला मिळाला असून आगीची तीव्रता लक्षात घेता इर्ला मार्केट परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या परिसरात अनेक दुकाने असून हा परिसर गजबजलेला असतो. विशेषत: इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या विक्रीसाठी हा बाजार ओळखला जातो. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

गुरूवारी मुंबईतील पवई परिसरात आग

गेल्या गुरूवारी मुंबईतील पवई परिसरात असलेल्या साकी विहार रोडवर लार्सन अँड टुबरो कंपनीच्या समोर साई ऑटो ह्युंदाईच्या सर्व्हिस सेंटरला भीषण आग लागली होती. यावेळी बाजूलाच असणाऱ्या महावीर क्लासिक या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले, ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याबाबत अद्याप माहिती समोर आले नाही. ही आग इतकी भीषण आहे की, आसपासच्या परिसरात सर्वत्र धुराचे लोट पहायला मिळत होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here