उत्तर प्रदेशातील प्रयागराज (Prayagraj) येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १२ कोटी रुपये खर्चून साहित्य तीर्थक्षेत्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता महापालिकेने प्रस्ताव दिला होता. यामध्ये साहित्यिक आणि सांस्कृतिक वर्षाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
यामध्ये सांस्कृतिक महत्त्वाच्या ठिकाणांना चिन्हांकित केले जाईल, या उद्यानात, साहित्यिक आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या ठिकाणांना चिन्हांकित केले जाईल आणि त्यांचे जतन केले जाईल. याशिवाय, शहराच्या (Prayagraj) साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशाबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. या योजनेला परवानगी मिळाल्याबद्दल महापौर उमेश चंद्र गणेश केसरवानी यांनी सरकारचे आभार मानले आहेत.
(हेही वाचा मुंबई उच्च न्यायालयाच्या Kolhapur Bench ची मागणी योग्य; केंद्रीय मंत्री बोलावणार संयुक्त बैठक)
या प्रकल्पामुळे शहरातील पर्यटन उद्योगालाही चालना मिळेल. शहराचा (Prayagraj) साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा पाहण्यासाठी लोक आकर्षित होतील. नगर पंचायत शंकरगड आणि कोरांवमध्ये विकासकामे केली जातील शंकरगड नगरपंचायतीत १.९५ कोटी खर्चून विवाह हॉल बांधला जाईल आणि ७ लाख खर्चून सीसी रस्ता आणि गटार बांधण्याचे काम केले जाईल. सुमारे २ कोटी रुपये खर्चून एक डिजिटल ग्रंथालय बांधले जाईल.
Join Our WhatsApp Community