सर्वोच्च न्यायालय परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न

128

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत आज, शुक्रवारी दुपारी सर्वोच्च न्यायालयाच्य नव्या इमारतीजवळ एका इसमाने आत्महदनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आग विझवून त्याला रुग्णालयात दाखल केलेय. पिडीत इसम हा नोएडा येथील रहिवासी आहे.

6 महिन्यांतील दुसरी घटना

या घटनेचा एक व्हिडिओ देखील प्रसारित झाला आहे, ज्यामध्ये पोलिस या पेटवून घेतलेल्या व्यक्तीला मदत करताना दिसत आहेत. यामध्ये आत्मदहन करणारी व्यक्ती, मी अतिशय गरीब असून माझे कुटुंब उपाशी आहे, असे माणूस म्हणताना ऐकू येते. तर आत्महत्या का कुठल्याही गोष्टीवर उपाय नसल्याचे पोलिस त्याला सांगताना दिसत आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, त्या व्यक्तीच्या व्यक्तीगत आयुष्यात अनेक समस्या असल्याने त्याने सर्वोच्च न्यायालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. या साऱ्या प्रकारामुळे तो कितपत जखमी झाला आहे, हे कळणे बाकी आहे. गेल्या 6 महिन्यांतील सर्वोच्च न्यायालयाबाहेर अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे.

(हेही वाचा ‘हे’ 15 दिवस मध्यरात्रीपर्यंत ध्वनीक्षेपक वाजवण्यासाठी मुभा…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.