एलाॅन मस्क यांचा नवा प्लॅन; आणणार ‘हे’ नवे सबस्क्रिप्शन माॅडेल

91

एलाॅन मस्क यांनी ट्वीटरचा ताबा घेतल्यापासूनच अनेक बदल केले आहेत. आता ते ट्वीटरमध्ये आणखी बदल करण्याच्या तयारीत आहेत. हा नवा बदल ट्वीटरवरील जाहिरातीसंदर्भात आहे. एलाॅन मस्क यांचे म्हणणे आहे की, ट्वीटर प्लॅटफाॅर्मवर दिसणा-या जाहिरातींची साईज आणि फ्रीक्वेंसी सुधारण्याची गरज आहे. तसेच, जाहिराती कमी करण्यासाठी आम्ही अधिक किंमतींचे सबस्क्रिप्शन माॅडेल सादर करण्याचा विचार करत आहेत. जे युजर्सना कोणत्याही जाहिरांशिवाय ट्वीटर वापरण्याची परवानगी देईल. दरम्यान काही दिवसांपूर्वीच मस्क यांनी ट्वीटरसाठी बुकमार्क फिचर आणण्याची घोषणा केली होती. लवकरच हे फिचर युजर्ससाठी रोलआउट केले जाऊ शकते.

ट्वीट करत दिली माहिती

मस्क यांनी ट्वीट करत म्हटले की,  ट्वीटरवरील जाहिरांतीची साईज आणि फ्रीक्वेंसी खूप मोठी आहे. येत्या आठवड्यात दोन्ही कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. तसेच, आम्ही अधिक किमतीचे सबस्क्रिप्शन माॅडेल लाॅन्च करणार आहोत. जेणेकरुन कोणत्याही जाहिराती येणार नाहीत. दरम्यान, जाहिराती कमी करण्यासाठी काय केले जाईल किंवा नव्या माॅडेलची किंमत काय असेल? याबाबत अद्याप एलाॅन मस्क यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

( हेही वाचा: औरंगाबादच्या कच-याच्या ढिगा-याला पुन्हा आग; 36 तासांनंतर आगीवर नियंत्रण )

नवे फीचर बुकमार्क लवकरच होणार रिलिज

आणखी एक नवीन फीचर ट्वीटर बुकमार्क लवकरच ट्वीटरवर रिलीज होत आहे. एलाॅन मस्क यांनी ट्वीट केले आहे की, ट्वीट बुकमार्क म्हणून सेव्ह केले जाऊ शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जरी ट्वीट बुकमार्क म्हणून सेव्ह केले गेले असेल तर मात्र किती लोकांनी ते ट्वीट बुकमार्क केले आहे हे युजर्सना कळणार आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.