राणीबागेत पुन्हा GoodNews! लवकरच मिळणार तिसरा मुंबईकर पेंग्विन!

भायखळा येथील राणीबागेत लवकरच नव्याने गुडन्यूज मिळणार आहे. उद्यानात डोनाल्ड आणि डेझी या पेंग्विनच्या जोडीने नवा पेंग्विन जन्माला घातला आहे. याबाबत लवकरच राणीबाग प्रशासन अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे.

(हेही वाचा – Voter ID: आता 17 व्या वर्षी बनवता येणार मतदार ओळखपत्र, निवडणूक आयोगाचा निर्णय)

गेल्या वर्षी ओरिओ आणि ऑस्कर हे दोन पेंग्विनचे पिल्लू राणीबागेत जन्माला आले होते. मात्र या दोघांच्याही आगनामाची घोषणा राणीबाग प्रशासनाने बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर केली होती. त्यापैकी ओरिओ हा डोनाल्ड आणि डेझी तर ऑस्कर हा मॉल्ट आणि फ्लिपर या जोडीचे पिल्लू अनुक्रमे 1 मे आणि 19 ऑगस्ट रोजी जन्माला आले. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून पेंग्विनच्या जोड्यांचा पुन्हा मिलनाचा काळ सुरु झाला.

त्यानंतर डोनाल्ड आणि डेझी आपल्या घरट्यातच राहू लागले. सध्या अधूनमधून डोनाल्ड घरट्याबाहेर निघतोय परंतु डेझीने घरट्यातच राहणे पसंत केले आहे. इतर पेंग्विन घरट्याजवळ आले की डोनाल्ड सर्वांनाच हकलावून लावतो. त्यामुळे घरट्यात नवा पिल्लू जन्माला आले आहे का याची माहिती लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती राणीबाग प्रशासननाने दिली.

राणीबागेत अजून दोन जोडपी आहेत त्यापैकी मॉल्ट आणि फ्लिपरचाही रोमान्स बहरला आहे. दोघेही घरट्याबाहेरही एकत्र फिरत आहेत. पोपाय आणि ऑलिव्हकडून अद्यापही एकदाही अजून गुडन्यूज मिळाली नाही. बबल मात्र अद्यापही जोडीदाराच्या प्रतीक्षेत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here