मुंबईत बीए व्हेरिएंटचा शिरकाव झालेला असतानाच आता डेल्टा या घातक विषाणूचाही रुग्ण सापडला. मुंबई महापालिकेच्या कोविड जनुकीय सूत्र निर्धारणांतर्गत १२व्या फेरीतील चाचणी अहवालात ही माहिती उघडकीस आली. या १२ व्या फेरीतील चाचण्यांसाठी २७९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २०२ नमुने मुंबईतील होते. २०२ नमुन्यांपैकी ९९.५% अर्थात २०१ नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या उप प्रकाराने बाधित तर एकाला डेल्टाची बाधा झाल्याचे समोर आले.
( हेही वाचा : शिक्षण ते लग्नापर्यंत ‘या’ योजनांचा लाभ घेत असे जमा करा पैसे!)
२०२ चाचण्यांचे वयोगटानुसार विश्लेषण
• २०२ रुग्णांपैकी ४४% अर्थात ८८ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटातील आहेत.
• ४१ ते ६० या वयोगटात देखील २६% म्हणजेच ५२ एवढेच रुग्ण आहेत.
• १६% म्हणजेच ३२ रुग्ण हे ६१ ते ८० या वयोगटातील आहेत.
• १२% अर्थात २४ रुग्ण हे ‘० ते २०’ या वयोगटातील; तर २% म्हणजे ५ रुग्ण हे ८१ ते १०० या वयोगटातील आहेत.
• २०२ नमुन्यांमध्ये ० ते १८ या वयोगटातील २४ नमुन्यांचा समावेश होता. एक रुग्ण पाचवर्षांच्याही आत होता. १० नमुने ६ ते १२ वर्षे या वयोगटातील; तर १३ नमुने १३ ते १८ वर्षे या वयोगटातील होते. हे सर्व नमुने ‘ओमायक्रॉन’ या कोविड विषाणुच्या उप प्रकाराने बाधित असल्याचे आढळून आले. या रुग्णांना कोविड बाधा झाल्याची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत.
२०२ चाचण्यांचे लसीकरणानुसार विश्लेषण
• ‘कोविड’ प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या आधारे विश्लेषण केले असता, २०२ पैकी २ रुग्णांनी लशीची केवळ पहिली मात्रा घेतलेली होती.
• लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या १२९ रुग्णांपैकी ९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी एका रुग्णास अतिदक्षात विभागात दाखल करावे लागले.
• एकूण रुग्णांपैकी ७१ रुग्णांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. यापैकी ९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर २ रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.
Join Our WhatsApp Community