खाल्ला गुटखा लागला ठसका… बातमी वाचून बसेल धक्का! काय घडलं नेमकं?

तंबाखू, गुटखा खर्रा खाणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे, असे वारंवार सांगितल्या जाते. असाच एक प्रकार अकोल्यात घडलाय. ही बातमी वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल यात शंका नाही. सचिन अविनाश आठवले या युवकाचा खर्रा खाल्ल्याने ठसका लागला आणि त्यातच या युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तुंलगा खुर्द येथे ही घटना घडली आहे. सचिन अविनाश आठवले याने खर्रा खाल्ला त्यानंतर या युवकाला ठसका लागला. दरम्यान या ठसक्यामुळे या युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

(हेही वाचा – Indian Railway: ट्रेनच्या बोगीवर असलेल्या ‘या’ पिवळ्या रेषांचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?)

मिळालेल्या माहितीनुसार, युवकाने खर्रा घोटा खाऊन ठसका लागल्याने या युवकाला श्वास घेणे कठीण झाले होते. त्यानंतर त्याचा श्वासही गुदमरला. हे पाहून तात्काळ गावातील नागरिकांनी वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले मात्र येथील डॉक्टरांनी या युवकाला मृत घोषित केले. त्यानंतर बाळापूर येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतर नेमका युवकाचा मृत्यू कशामुळे झाला हे समोर येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here