कहरच! घराच्या समोरील अंगणातच केली गांजाची लागवड अन्…

आकोट शहरात एका आरोपीने चक्क घरासमोरील अंगणात गांजाची लागवड केल्याचे शनिवार, 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईने उघड झाले आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

काय घडला प्रकार

अकोट मधील भीमनगर येथील एका व्यक्तीने चक्क घरा समोरील अंगाणातच गांजाच्या झाडाची लागवड केल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. त्यांनी पथकासह भीमनगर येथील 45 वर्षीय गणेश पांडुरंग दारोकार यांच्या घरावर छापा घातला. यावेळी त्याच्या घरासमोर गांजाचे झाड आढळून आले.

(हेही वाचा – आता IPL मध्ये 11 नाही, तर 15 खेळाडू उतरणार मैदानात, BCCI नवा नियम)

मिळालेल्या माहितीनुसार, घरासमोर असणाऱ्या झाडाची इंची 12 फुट इतकी होती. त्याचे वजन 10 किलो होते. तर बाजारपेठेतील या झाडाची किंमत 50,000 रुपये इतकी होती. या झाडाची विनापरवाना लागवड त्याने केली होती. आरोपी गणेश दारोकार हा गांजाच्या झाडाची पाने वाळवून त्याची विक्री करत होता.दरम्यान, पोलिसांनी हे गांजाचे झाज जप्त केले असून आरोपी विरोधात अकोटशहर पोलीस स्टेशन येथे NDPS एक्ट कलम 20B प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here