धार्मिक नावे आणि चिन्हे यांचा वापर करणाऱ्या राजकीय पक्षांना निवडणूक लढवण्यास बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारकडून 4 आठवड्यांत उत्तर मागितले आहे.
राजकीय पक्षांकडून धार्मिक नावांचा आणि चिन्हांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत यावर आक्षेप घेण्यात आला होता. वसीम रिझवी यांनी या विरोधात याचिका दाखल केली आहे. जर धर्माच्या नावावर मते मागणे बेकायदेशीर असेल, तर पक्षाचे नावही धर्माच्या आधारावर असू शकत नाही, असे मत याचिकाकर्ते रिझवी यांनी व्यक्त केले आहे. यासाठी त्यांनी इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि हिंदू एकता दल या पक्षांचे उदाहरण दिले आहे. याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे वकील गौरव भाटिया यांनी न्यायालयात सांगितले की, राजकीय पक्षांच्या भांडणात चंद्र ताऱ्यांचा वापर थांबवावा. न्यायालयाने अशा पक्षांना निवडणूक लढवण्यास बंदी घालावी. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारकडून 4 आठवड्यांत उत्तर मागितले आहे.
( हेही वाचा: शेलारांचं शिवसेनेला प्रत्युत्तर! म्हणाले, “तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा आणि…” )
Join Our WhatsApp Community