गोव्याच्या दिशेने येणा-या विमानाला बाॅम्बने उडवून देण्याची धमकी; विमानाचा मार्ग वळवला

99

रशियाच्या माॅस्को येथून भारतात गोव्याच्या दिशेने येणा-या एका विमानाला बाॅम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यामुळे एकच खळबळ माजली. गोवा विमानतळावर एका ईमेलच्या माध्यमातून ही धमकी मिळाली. ज्यानंतर सतर्कतेची पावले उचलत भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्यापूर्वीच या विमानाचा मार्ग वळवून ते उझबेकिस्तानच्या दिशेने फिरवण्यात आले. उझबेकिस्तानमध्ये लॅंड केल्यानंतर तातडीने या विमानात बाॅम्ब शोधक पथक दाखल होत पुढील कारवाई सुरु केली.

संबंधित अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान अजुर एअर या विमानसेवा देणा-या कंपनीचे असून, त्यामध्ये 247 प्रवासी प्रवास करत होते. सध्या हे सर्व प्रवासी उझबेकिस्तानातील विमानतळावर सुखरुप आहेत.

( हेही वाचा: कोरोना काळातील मनपा घोटाळ्याचे पुरावे असलेला ‘पेन ड्राईव्ह’ हाती; देशपांडेंचा गौप्यस्फोट )

धमकीनंतर विमानाचा मार्ग बदलला

गोव्याच्या दिशेने येणा-या एखाद्या विमानाला बाॅम्बने उडवण्याची धमकी दिली जाण्याची ही दुसरी वेळ आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच अजुर एअरच्या एका चार्टर्ड प्लेनला बाॅम्बने उडवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर विमानाला गुजरातमध्ये जामनगरच्या दिशेने वळवले गेले होते. दरम्यान, अजूर एअरचे हे विमान AZV2463 पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गोव्याच्या दक्षिणेकडे असणा-या डाबोलिम विमानतळावर लॅंड होणार होते. पण, भारतीय हवाई हद्दीत येण्याआधीच त्याचा मार्ग वळवण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.