पिझ्झापेक्षा विमानाची तिकीट स्वस्त; म्हणूनच तो पिझ्झासाठी ब्रिटनहून इटलीला गेला

सध्या प्रचलित असलेल्या खाद्य पदार्थांमध्ये पिझ्झा हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. विशेषतः तरुण मुलामुलींना हा प्रकार खूपच आवडतो. झोमॅटो, स्विगी या डिलिव्हरी सर्व्हिसेसमुळे तर घरबसल्या पिझ्झा मागवता येतो. लोक पिझ्झा खायला वेगवेगळ्या ठिकाणी जातात. पण एक व्यक्ती पिझ्झा खाण्यासाठी थेट दुसर्‍या देशात गेली.

हो, हे अगदी खरं आहे. ब्रिटनमधील एक माणूस पिझ्झा खाण्यासाठी इटलीमध्ये गेला. पिझ्झा खाण्यासाठी त्याने विमानातून प्रवास केला. ज्याची किंमत केवळ १९.९९ पाउंड म्हणजे फक्त २००० रुपये आहे. गंमतीची बाब म्हणजे ब्रिटनमध्ये पिझ्झाची साधारण एवढीच किंमत आहे. म्हणजे पिझ्झाच्या किम्मतीपेक्षा विमानाचं तिकिट स्वस्त आहे.

( हेही वाचा: देशभरात 70 हून अधिक ठिकाणांवर NIA ची छापेमारी; काय आहे प्रकरण? )

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Callum Ryan (@thatonecal)

या व्यक्तीचं नाव आहे कॅलर रायन. त्याने इन्स्टावर पोस्ट देखील केली आहे. त्याला केवळ ८ पाउंडमध्ये विमानाचं तिकीट मिळालं. इटलीमधील पिझ्झेरियनमध्ये जाऊन त्याने मार्गारिटा पिझ्झा मागवला. या पिझ्झाची किंमत ११ यूरो म्हणजे साधारण ९ पाऊंड आहे. त्याच्या ब्रिटनमध्ये १९.९९ पाउंडमध्ये पिझ्झा मिळतो. तर त्याचा प्रवास आणि पिझ्झा असा दोन्ही खर्च पकडून सुमारे १७ पाउंड एवढा खर्च आला आहे. म्हणजे केवळ रुपये १ हजार ५८५.  कॅलर रायनला माहिती आहे की हा मूर्खपणा आहे. पण तो म्हणतो की, मला आयुष्यात हा मूर्खपणा करुन बघायचा होता. पण खरंच जमाना किती विचित्र आहे. पिझ्झासारखा पदार्थ महाग आणि विमानाचं तिकिट स्वस्त. याला घोर कलीयुग असंच म्हणता येईल!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here