भायखळा कारागृहाबाहेर ड्युटीवरील पोलिसाने स्वतःवर झाडली गोळी

भायखळा कारागृहाबाहेर तैनात असलेल्या एका पोलिसाने स्वतः वर गोळी झाडली. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ताडदेव लोकल आर्म युनिट २ मधील श्याम वरगडे असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. त्याची नियुक्ती भायखळा जेलच्या गेटवर होती.

रात्री 8:20 वाजता त्याने एसएलआरमधून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समजत आहे. नागपाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसाला नायर रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

(हेही वाचा महिला क्रिकेट संघाचे वर्ल्ड कपचे स्वप्न भंगले; ऑस्ट्रेलियासोबत जिंकता जिंकता हरले)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here