AIIMS वरील सायबर हल्ला हॉंगकॉंगमधून?

दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या सर्व्हरवर हाॅंगकाॅंगमधून सायबर हल्ला झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पण त्याला तपास यंत्रणांनी दुजोरा दिलेला नाही. या हॅकिंग प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणा चौकशी करत आहे. एम्स रुग्णालयात अतिशय महत्त्वाचे राजकीय नेते, व्यक्ती उपचारांसाठी येत असल्याने त्यांची माहिती उघड होऊ नये, यासाठी आता डिफेन्स रिसर्च अॅंड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन एम्सला सर्व्हर पुरवणार आहे.

एम्स रुग्णालयात 50 हून अधिक सर्व्हर आहेत.  सायबर हल्ल्यात हे सर्व्हर हॅक करण्यात आले होते. त्यातील मुख्य सर्व्हर एनआयएने आपल्याबरोबर तपासणीसाठी नेला आहे. या रुग्णालयातील सर्व संगणकांमध्ये आता अॅंटीव्हायरस टाकण्यात येत असून, त्यांचेही स्कॅनिंग करण्यात येत आहे. डीआरडीओकडून एम्सला पहिल्या टप्प्यात पाच ते दहा सर्व्हर व त्यानंतर इतर सर्व्हर पुरवण्यात येणार आहेत.

( हेही वाचा: शेअर ब्रोकरवर ईडीची छापेमारी; मुंबईसह ‘या’ शहरांत कारवाई )

सर्व डेटा पुन्हा उपलब्ध

  • सायबर हल्ला व हॅकिंग झाल्यानंतर दिल्ली एम्सचे सर्व्हर 23 नोव्हेंबरपासून बंद होते. पण सात दिवसांनी सर्व डेटा पुन्हा एम्सच्या सर्व्हरवर उपलब्ध झाला आहे.
  • हॅकर्सनी 200 कोटी रुपयांची खंडणी क्रिप्टो चलनात मागितली होती, असेही सांगण्यात येत होते.
  • सायबर हल्ल्यामुळे एम्समधील संगणक प्रणालीला मोठा फटका बसला. त्याचा परिणाम तेथील वैद्यकीय सेवांवर झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here