नालासोपा-यात अवैधरित्या प्राण्यांची विक्री; वाचा पुढे काय झाले

134

नालासोपारा येथे वनाधिका-यांनी टाकलेल्या धाडीत अनेक दुर्मिळ परदेशी प्राण्यांची तस्करी उघडकीस आली आहे. या प्राण्यांसह अल्बिनो अजगर आणि स्टार प्रजातीच्या कासवांचीही तस्करी रोखण्यापासून वनाधिका-यांना यश आले. केंद्राच्या वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा तसेच महाराष्ट्र वनविभागाने मिळून ही कारवाई केली.

माहितगारांच्या आधारे नालासोपारा येथेच प्राण्यांची तस्करी तसेच विक्री होत असल्याची माहिती वनाधिका-यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी सकाळपासूनच वनाधिका-यांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. आरोपी सकाळीच वनाधिका-यांच्या हाती लागला. त्याच्याकडून वनाधिका-यांनी हिरव्या रंगाचा ईग्वाना नावाचा सरडा, कॉर्न स्नेक नावाचा साप, बिअर्डेड ड्रगॉन, केनियन सॅण्ड बोआ, टारानटुला, विंचू आदी परदेशी प्रजातींचे प्राणी यावेळी वनाधिका-यांनी हस्तगत केले. यासह अल्बिनो अजगर आणि स्टार प्रजातीचे कासवही वनाधिका-यांना सापडले. अजगर आणि स्टार प्रजातीचे कासव भारतीय संवर्धन कायदा १९७२ नुसार संवर्धित असल्याने आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी नालासोपारा येथील रहिवासी असल्याचे तपासाअंती वनाधिका-यांच्या लक्षात आले. गुरुवारी आरोपीला न्यायालयात हजरही करण्यात आले. मात्र कारवाईचे गांभीर्य लक्षात घेता, अधिक तपशील त्वरित देता येणार नाही, अशी माहिती वनाधिका-यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.