तुम्ही राहत असलेले शहर जाणार पाण्याखाली? जाणून घ्या काय आहे कारण?

उत्तराखंडमधील जोशीमठमध्ये घरांना, जमिनींना भेगा पडल्या असून या भेगा दिवसेंदिवस मोठ्या होत आहे. बदलत्या हवामानामुळे हे संकट भविष्यात अजून गडद होण्याची शक्यता शास्त्रज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. बदलत्या हवामानामुळे 2050 आणि 2100 पर्यंत जगभरातील अनेक शहरे पूर्णपणे पाण्याखाली जातील, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. एका अहवालानुसार, हवामान बदलामुळे येत्या काही वर्षांत जगातील काही शहरे जलमय होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. येत्या आठ ते नऊ वर्षांत जगातील काही शहरे अशी आहेत जी समुद्र पातळी वाढल्यामुळे आणि पुरामुळे पाण्याखाली जाऊ शकतात. या यादीत भारतातील एका शहराचाही समावेश आहे.

क्लायमेट सेंट्रल नावाच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, हवामान बदलामुळे येत्या काही वर्षांत जगातील 9 शहरे बुडू शकतात. ही शहरे कोणती आहेत ते जाणून घ्या.

( हेही वाचा: वकिलांची नोकरी धोक्यात; आता ‘रोबो वकिल’ म्हणणार ‘माय लाॅर्ड’ )

कोलकाता

पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्याच्या आसापासची जमीन अतिशय सुपीक मानली जाते. पण क्लायमेट सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, समुद्राच्या पातळीत झालेली वाढ या शहराचे अस्तित्वच संपुष्टात आणू शकते. कोलकात्याला मान्सूनचा पाऊस आणि भरती-ओहोटीची समस्या भेडसावत आहे. पावसाळ्यात येथे पूर येतो. येथे पावसाचे पाणी जमिनीत जात नाही. त्यामुळे येत्या काळात हे संपूर्ण शहर पाण्याखाली जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

जगातील ही 8 शहरे जाणार पाण्याखाली?

  • आम्सटरडॅम ( नेदरलॅंड)
  • बसरा ( इराक)
  • न्यू ऑर्लीन्स ( यूएसए)
  • व्हेनिस ( इटली)
  • हो ची मिन्ह ( व्हिएतनाम)
  • बॅंकाॅक ( थायलंड)
  • जाॅर्जटाऊन ( गायना)
  • सवाना ( अमेरिका)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here