नागाचे चुंबन घेऊन सर्पमित्राने संपवले जीवन, कारण ऐकून व्हाल थक्क!

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरातील एका सर्पमित्राने आपल्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून थेट नागाचेच चुंबन घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.11) सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. नागेश श्रीधर भालेराव (34) असे मृत सर्पमित्राचे नाव आहे.

काय आहे प्रकरण

नागेश हा शहरातील एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये तसेच होर्डिंग चिकटवण्याचे काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. नागेशने दोन दिवसापूर्वी स्वतःची व्हिडीओ क्लिप बनवत पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार असल्याचे त्याने म्हटले होते. त्याआधी त्याने स्टँम्प पेपरवर वैवाहिक जीवनामध्ये झालेल्या फसवणूकीविषयी उल्लेख केला होता. त्याच्या पत्नीकडून त्याला व कुटुंबियांना मानसिक त्रास होत असल्याचे त्याने स्टँम्प पेपरवर नमुद केले होते. पत्नीकडून त्याला वेळोवेळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात येत असल्याने तो कंटाळून घर सोडून गेल्याचे त्याने व्हिडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे.

(हेही वाचा – जानेवारीपासून बोंबलायचंय म्हणून सध्या घशाला आराम देतोय, राज ठाकरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण)

पत्नीच्या मानसिक त्रासामुळे माझ्या जीवनाचे काही बरेवाईट झाल्यास त्यास पत्नी जबाबदार राहील असेही नागेशने पेपरवर नमूद केले होते. त्यानंतर शुक्रवारी त्याने एका ठिकाणी पडलेला कोब्रा जातीचा नाग सिन्नर महाविद्यालयासमोरील कॅफेमध्ये आणला. कॅफेच्या वरती बिल्डिंगच्या गच्चीवर जात नागेश याने नागाचे चुंबन घेत आत्महत्या केली. नागाने त्याच्या ओठांना व गालाला तीन वेळेस दंश केला. त्याच्या मित्रांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नागेशला तात्काळ उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. 12) शवविच्छेदन करुन मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला.

स्टंट नसून आत्महत्या

नागेश हा काही वर्षांपासून सर्प पकडण्याचे काम करत होता. मात्र, आजवर त्याला कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. गेल्या काही दिवसांपासून तो आपल्या पत्नीच्या त्रासाला कंटाळलेला असल्याने त्याने घर सोडण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र, पत्नीकडून तो बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर त्याने मोबाईलवर स्वता:चा व्हिडीओ बनवत मी बेपत्ता नसून मी इथेच असल्याचे त्याने सांगितले होते. तसेच मी माझ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळलो असून माझ्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक नसल्याचे त्याने क्लिपमध्ये स्पष्ट म्हटले होते. मात्र, त्याने नागाला पकडून त्याच्यासोबत स्टंट करताना नागाने त्याला दंश केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे अफवा असून नागेशने स्वता:हून नागाचे चुंबन घेऊन आत्महत्या केल्याचे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here