आयआयटी मुंबईमधील मुलींच्या स्नानगृहात डोकवणाऱ्या तरूणाला अटक

95

चंदीगड युनिव्हर्सिटी ‘एमएमएस कांड’ प्रकरण ताजे असतानाच मुंबईच्या आयआयटीच्या गर्ल हॉस्टेलमध्ये असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. आयआयटी कँटीनमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाला ड्रेनेज पाईपवर चढून मुलीच्या स्नानगृहाच्या खिडकीतून एका मुलीला आंघोळ करताना बघत असताना पकडण्यात आले आहे.

( हेही वाचा : आमदार नसतानाही वारिस पठाण मिरवताहेत ‘आमदारकीची शेखी’; गाडीवर अशोकस्तंभासह लोगो कायम)

सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्याने या मुलीचे व्हिडीओ मोबाईल फोनमध्ये घेतले होते मात्र हॉस्टेलच्या अधिकाऱ्यांनी ते सर्व व्हिडीओ डिलीट करून या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पिंटू गारीया (२२) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पिंटू हा पवई येथील आयआयटीच्या आवारात असलेल्या कँटीनमध्ये मागील ८ महिन्यापासून कामाला आहे, हे कँटीन कंत्राटी पद्धतीवर देण्यात आले आहे.

कॅंटीनमध्ये काम करणारा पिंटू हा रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मुलींच्या हॉस्टेल क्रमांक १० च्या मागे असलेल्या ड्रेनेज पाईप लाईनवर चढून पहिल्या मजल्यावरील बाथरूम मध्ये मुलींना आंघोळ करताना बघत होता, एका मुलीच्या हे लक्षात येताच तिने आरडाओरड केली. हॉस्टेलच्या कर्मचाऱ्यांनी पिंटूला पकडून हॉस्टेलच्या अधिष्ठातांच्या कार्यालयात आणले. अधिष्ठाता कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पिंटूच्या ताब्यातील मोबाईल घेऊन त्यातील व्हिडिओ डिलीट केले, त्यानंतर पवई पोलिसांना याबाबत माहिती देऊन त्याला पवई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याप्रकरणी पवई पोलिसांनी पिंटूच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून त्याच्या जवळील मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब कलिना येथे पाठविल्याची माहिती पवई पोलिसांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.