स्वातंत्र्यवीर सावरकर (Savarkar) यांचे कनिष्ठ बंधू नारायणराव सावरकर यांचे सुपुत्र आणि हिंदू महासभेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सावरकर (Savarkar) आणि हिंदुत्ववादी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेचे नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांच्यात एक विलक्षण साम्य आहे. या दोन्ही हिंदूत्ववादी नेत्यांचा जन्मदिवस आणि निर्वाणदिन एकच आहे.
दोन्ही विभूती दीर्घायुषी
विक्रम सावरकर (Savarkar) आणि मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचा जन्म २ डिसेंबर या दिवशी झाला तर त्यांचे निधन २३ फेब्रुवारी या दिवशी झाले. तसेच या दोन्ही विभूतिंना दीर्घायुष्य लाभले. विक्रम सावरकर यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले तर जोशी यांचे वय ८६ होते.
सावरकरांच्या सैनिकी शाळेच्या संकल्पनेने प्रभावित
स्वातंत्र्यवीर सावरकर (Savarkar) राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि विक्रम सावरकर (Savarkar) यांचे सुपुत्र रणजित सावरकर यांनी या दोन हिंदू नेत्यांच्या भेटीची एक आठवण या निमित्ताने सांगितली. विक्रम सावरकर (Savarkar) यांच्या ६१ व्या वाढदिवासानिमित्त (१९९३) सावरकर स्मारक सभागृहात आयोजित कार्यक्रमासाठी मनोहर जोशी (Manohar Joshi) आले असताना ते विक्रम सावरकर यांच्या सैनिकी शाळेच्या संकल्पनेने प्रभावित झाले आणि जोशी यांनी तात्काळ जाहीर केले की राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यास प्रत्येक जिल्ह्यात एक सैनिकी शाळा सुरू करू. स्वातंत्र्यवीर सावरकर (Savarkar) सेवा समितीच्या माध्यमातून विक्रम सावरकर यांनी मुरबाड, जिल्हा-ठाणे येथे १५ ऑगस्ट १९९३ ला ‘महाराष्ट्र सैनिकी विद्यालय’ सुरू केली आहे.
शब्द पाळला
त्यानंतर १९९५ मध्ये शिवसेना-भाजपचे सरकार राज्यात आले आणि खुद्द मनोहर जोशी (Manohar Joshi) मुख्यमंत्री झाले. जोशी (Manohar Joshi) यांनी मात्र दिलेला शब्द पाळला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जिल्ह्यांत ३० सैनिकी शाळांना मान्यता दिली. त्या शाळा आजही सुरू आहेत.
स्मारकाशी दृढ नाते
यानिमित्ताने जोशी (Manohar Joshi) आणि स्वातंत्र्यवीर सावरकर (Savarkar) स्मारकाचे नाते आणखी दृढ होत गेले. २२ ते २८ मे १९९५ या कालावधीत स्वातंत्र्यवीर सावरकर (Savarkar) जयंती व्याख्यानमाला स्मरकात आयोजित करण्यात आली होती, त्या व्याख्यानमालेचे उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी सावरकर (Savarkar) स्मरकाच्यावतीने जोशी यांचा उल्लेख ‘हिंदुत्वनिष्ठ मुख्यमंत्री’ असा केला जात असे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community