राज्यात ओमायक्रॉन पसरतोय की दुसरा विषाणू ? जाणून घ्या…

88

जून महिन्याच्या सुरूवातीला राज्यात कोरोना रुग्ण वेगाने वाढत आहेत. पुण्यात आठवड्याभरापूर्वी ओमायक्रॉन विषाणूचे उपप्रकार आढळून आल्यानंतर राज्यातही ओमायक्रॉन विषाणूचे उपप्रकार पसरल्याची शक्यता आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केली. जनुकीय चाचण्यांच्या माध्यमातून आठवड्याभरापूर्वी पुण्यात सात रुग्ण आढळले असले तरीही राज्यात इतरही ओमायक्रॉनच्या विषाणूच्या उपप्रकाराचा फैलाव नाकारता येत नाही, असेही डॉ. आवटे म्हणाले.

( हेही वाचा : Traffic problem in Mahabaleshwar : महाबळेश्वर होणार इको हिल स्टेशन! खासगी वाहनांवर येणार बंदी?)

२८ मे रोजी पुण्यात ओमायक्रॉन उपप्रकाराचे बीए ४ आणि बीए ५ व्हेरिएंटचे रुग्ण आढळले. त्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्या वेगाने वाढली. परिणामी, आठवड्याभरात रुग्ण बरे होण्याचा टक्का काही अंशाने सातत्याने खालावत आहे. सोमवारी ९८.०३ टक्क्यांवर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे पहायला मिळाले. सोमवारीही नव्या रुग्णांच्या यादीत हजारांच्या संख्येनेच भर पडली. राज्यात १ हजार ३६ नवे कोरोनाचे रुग्ण असून ३७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

पाच जिल्ह्यांत रुग्ण वाढ झपाट्याने

मुंबई, ठाणे, पुणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत आठवड्याभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मुंबईत सध्या ५ हजार २३८, ठाण्यात १ हजार १७२, पुण्यात ५३४, रायगडात २०० आणि पालघरमध्ये ११२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दैनंदिन नवीन रुग्णांची संख्या 

३१ मे – ७११
१ जून – १ हजार ८१
२ जून – १ हजार ४५
३ जून – १ हजार १३४
४ जून – १ हजार ३५७
५ जून – १ हजार ४९४
६ जून – १ हजार ३७४

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.