घटस्फोटाचे प्रमाण वाढतेय.. कारणं ऐकून व्हाल थक्क

150

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे नेहमीच आपण मोठ्यांकडून ऐकत असतो. पण त्या गाठी तुटायला काहीसे क्षुल्लक वाद आणि त्याचे कारणही पुरेसे होते. गेल्या काही वर्षांत देशात झालेल्या घटस्फोटांच्या वाढत्या आकडेवारीतून याचा प्रत्यय येत आहे. ही वाढती आकडेवारी नुसती संख्या नाही तर त्याला काही कारणं देखील आहेत. गेल्या काही वर्षात भन्नाट कारणांमुळे झालेल्या घटस्फोटाच्या कारणांची यादी एका सर्वेक्षणाद्वारे समोर आली आहे. कोणती आहेत काही कारणं…

(हेही वाचा – गणेशोत्सवादरम्यान ‘BEST’ कडून ‘निलांबरी’ बससेवा! काय आहेत वैशिष्ट्य?)

१) पत्नी चहा करून देत नाही

दीड महिना सकाळचा चहा पत्नीने करून दिला नाही. तसेच मित्र आल्यानंतर देखील चहा करण्यास नकार दिला, त्यामुळे अपमान झाला या कारणास्तव घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढले आहे.

२) मांसाहार आवडतो पण करणार नाही

प्रेम विवाह केलेल्या एका मुलाने लग्नानंतर आपण मांसाहार करणार नसल्याचे सांगितले. मात्र, तरीही त्याला मांसाहाराची इच्छा अनावर झाल्याने त्याने अनेक रात्री मित्रांकडे राहत मांसाहार केल्याचे पत्नीला समजले. पत्नीने फसवणूक झाल्याचे सांगत घटस्फोट घेतला.

३) वजन वाढल्याने ती बेढब दिसू लागली

पत्नीचे वजन वाढले आणि तिचे शरीर बेढब दिसू लागले. अनेकवेळा सांगूनही तिने वजन केले नाही. त्यामुळे मानसिक त्रास झाल्याचे सांगत एका पतीने तिच्यासाठी काडीमोड घेतला.

४) आईच्या हातच्या चव पत्नीच्या हाताला नाही

आईच्या हातच्या स्वयंपाकाची चव पत्नीच्या हाताला नाही. यामुळे भ्रमनिरास होत असल्याचे सांगत पती पत्नीपासून विभक्त होत त्याने घटस्फोट घेतला.

५) पत्नीच्या गालावर पिंपल्स 

पत्नीच्या गालावर अनेक पिंपल्स आहेत. त्यामुळे मला मानसिक त्रास होतो. ती नकोशी वाटतेय, या कारणास्तव पतीने आपल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्याचे समोर आले आहे.

६) घर लहान आहे

लग्नापूर्वीचे घर मोठे होते. लग्नानंतर लहान घरात राहावे लागत आहे. मोठ्या घरासाठी नवरा काहीच करत नाही या कारणास्तव देखील घटस्फोट झाल्याचे समोर आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.