पाकिस्तानच्या मशिदीत स्फोट; 61 लोक जागीच ठार

156

पाकिस्तानमधील अशांत असणा-या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पेशावरमधील उच्च पातळीवरची सुरक्षा असलेल्या भागात सोमवारी एका तालिबानी आत्मघाती दहशतवाद्याने दुपारी नमाजावेळी स्वत:ला उडवून दिल्याने तेथील 61 नागरिक जागीच ठार झाले, तर 150 हून अधिक जखमी झाले असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. ज्या ठिकाणी स्फोट घडवून आणला गेला त्याठिकाणी दुपारी 1:40 च्या सुमारास,  अनेक नागरिक पोलीस लाइन्स क्षेत्राजवळ दुपारची नमाज अदा करत होते.

त्यावेळी पुढच्या रांगेत बसलेल्या आत्मघातली तालीबानी स्फोटकांचा त्याच ठिकाणी स्फोट केला. स्फोटकांचा स्फोट झाल्यानंतर मशिदीचे छत उपासकांवर पडल्याने त्यातच अनेक जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ठार झालेल्यांमध्ये पोलीस, लष्कर आणि बाॅम्बशोधक पथकाचे कर्मचारी आहेत.

( हेही वाचा: मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि बसचा भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू )

लेडी रिडिंग हाॅस्पिटलच्या अधिका-यांनी सांगितले की, आतापर्यंत 61 जणांनी आपला जीव गमवावा लागला आहे, तर 150 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बहुतांश पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा अधिकारी जास्त आहेत. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.