मुंबई पोलिसांना सॅल्यूट! ‘त्या’ महिलेला बुडतांना वाचवलं आणि…; बघा व्हिडिओ

92

मुंबई पोलीसांच्या तत्परतेचे दर्शन घडवणारे अनेक प्रसंग आपण ऐकले वा पाहिले असतील. आता असाच एक पोलीसांच्या प्रसंगावधानाचे दर्शन घडवणारा व्हिडिओ समोर आला आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे समुद्रात बुडणा-या महिला पर्यटकाला मुंबई पोलिसांनी वाचवलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पोलिसांच्या या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे.

पोलिसांनी वाचवला जीव

महिला गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाच्या दिशेने प्रवास करीत होती. दरम्यान, बोटीतून प्रवास करताना लाटेच्या धडकेमुळे बोटीला मोठा धक्का बसला आणि महिला समुद्रात पडली. सुदैवाने या महिलेने लाईफ जॅकेट घातले होते. यामुळे महिला बराच वेळ पाण्यात तरंगत होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्ठळी धाव घेऊन, या महिलेचा जीव वाचवला. महिलेला बोटीत घेण्यासाठी मुंबई पोलीस कर्मचारी आणि सागरी रक्षक यांनी जीवाची बाजी लावली. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नेटक-यांकडून मुंबई पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

( हेही वाचा :सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, सीएनजीसह घरगुती गॅस महागला! )

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात दररोज हजारो पर्यटक येत असतात. गेट वे ऑफ इंडिया येथून अनेक पर्यटक बोटीने एलिफंटा आणि मांडवाला प्रवास करतात. रविवारच्या दिवशी या ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.