Amaravati Road Accident: अमरावतीत भीषण अपघात; 6 जण जागीच ठार

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा- बहिरम मार्गावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तब्बल सहा जणांचा जीव गेला आहे, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. दुचाकी आणि कार यांच्यात धडक होऊन हा अपघात झाला होता. इनोव्हा कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या या अपघातात बहिरम येथील तिघांचा तर बोधड येथील तिघांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामध्ये सहा जण जागीच ठार झाल्याने, हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं

दोघे जण बाईकवरुन गावी जायला निघाले होते. त्यावेळी भरधाव इनोव्हा कारने मागून या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार तरुण पुलावरुन थेट खाली फेकला गेला. या तरुणाला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर इनोव्हा कार चालकाचंही नियंत्रण सुटलं आणि इनोव्हाही अपघातग्रस्त झाली. या अपघातात इनोव्हा गाडी चक्काचूर झाली असून, फोटोवरुन हा अपघात किती भीषण होती याची कल्पना करता येऊ शकेल.

( हेही वाचा: पुस्तकांचीही झाली होती फाळणी; त्यावेळचा ‘हा’ जगप्रसिद्ध फोटो पाहिलात का? )

अपघातातील जखमी आणि मृतांची नावे

  • जखमी– संजय गजानन गायन (वय 22) राहणार बोधड, तालुका चांदूर बाजार

मृत्यू झालेल्यांची नावे

  • पांडुरंग रघुनाथ शनवारे (वय 30) राहणार बोधड, तालुका चांदूर बाजार
  • सतीश सुखदेव शनवारे(वय 30) राहणआर बहिरम कारंजा
  • सुरेश विठ्ठल निर्मळे  (वय 25 )राहणार खरपी
  • रमेश धुर्वे, Innova चालक ( वय 30), राहणार सालेपूर
  • MH-27-S-4670 होंडा स्प्लेंडरचा चालक: नाव प्रतिक दिनेशराव मांडवलकर (वय 26)
  • अक्षय सुभाष देशकर, (वय 26) राहणार बोधड तालुका चांदूर बाजार

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here