James Bond ची भूमिका साकारणारा अष्टपैलू अभिनेता

165

पियर्स ब्रेंडन ब्रॉस्नन हे एक आयरिश अभिनेते आणि चित्रपट निर्माते आहेत. त्यांचा जन्म १६ मे १९५३ रोजी झाला होता. जेम्स बाँड (James Bond) चित्रपट मालिकेत जेम्स बाँडची मुख्य भूमिका साकार करणारे ते पाचवे अभिनेते होते. त्यांनी १९९५ ते २००२ या सालादरम्यान गोल्डन आय, टुमॉरो नेव्हर डाइज, द वर्ल्ड इज नॉट इनफ आणि डाय अनदर डे या चार चित्रपटांत महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

वयाच्या सोळाव्या वर्षी शाळा सोडल्यानंतर ब्रॉस्नन यांनी व्यावसायिक अभिनयाचं प्रशिक्षण सुरू केलं. त्यासाठी त्यांनी तीन वर्षं लंडनमधल्या ड्रामा स्कुलमध्ये ऍडमिशन घेतलं होतं. रंगमंचावरच्या कारकीर्दीनंतर ते दूरदर्शनवरच्या रेमिंग्टन स्टील नावाच्या मालिकेतून लोकप्रिय झाले. मालिका संपल्यानंतर ब्रॉस्नन यांनी ‘द फोर्थ प्रोटोकॉल’ आणि ‘मिसेस डॉटफायर’ नावांचे चित्रपट केले.

भूमिका जगभरात लोकप्रिय

त्यांनी साकारलेली जेम्स बाँडची (James Bond) भूमिका जगभरात लोकप्रिय झाली. ब्रॉस्नन यांनी डॅन्टेज पीक आणि द थॉमस क्राउन अफेअर या रिमेक चित्रपटांतही काम केलं. याव्यतिरिक्त त्यांनी इतर प्रमुख चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. जेम्स बाँडची भूमिका सोडल्यानंतर त्यांनी द घोस्ट रायटर, द लाइटनिंग थीफ, द नोव्हेंबर मॅन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.

याव्यतिरिक्त त्यांनी मम्मा मिया!, सिक्वेल मम्मा मिया!,  हिअर वी गो अगेन आणि द स्टोरी ऑफ फायर सागा यांसारख्या चित्रपटांतही भूमिका साकारल्या. २०२२ साली ब्रोस्नन यांनी DC ची युनिव्हर्सल फिल्म ब्लॅक ॲडममध्ये केंट नेल्सन म्हणजेच डॉक्टर फेटची भूमिका साकारली. ब्रॉस्नन यांचं नाव नॅन्सी ॲस्टर आणि द मॅटाडोर या चित्रपटांसाठी दोन गोल्डन ग्लोब अवॉर्डकरीता नामांकित करण्यात आलं. १९९६ साली ब्रॉस्नन आणि अमेरिकन चित्रपट निर्माता ब्यू सेंट क्लेअर यांनी एकत्र येऊन लॉस एंजेलिस बेस ‘आयरिश ड्रीमटाईम’ नावाच्या एका उत्पादन कंपनीची स्थापना केली. ब्रॉस्नन हे त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आणि पर्यावरण वाचवण्यासाठी देखील ओळखले जातात.  १९९७ साली ब्रॉस्नन यांना त्यांच्या चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल ’हॉलीवूड वॉक ऑफ फेम’ने सन्मानित केले. २०२० साली आयरिश टाईम्सने जाहीर केलेल्या सर्वोत्तम आयरिश चित्रपट अभिनेत्यांच्या यादीत पंधराव्या क्रमांकावर पियर्स ब्रॉस्नन यांची नोंद करण्यात आली होती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.