मुंबईत आत्मघाती हल्ल्याचा कट?; संशयित दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात

NIA raids in 3 southern states over Coimbatore and Mangaluru blasts
कोईम्बटूर स्फोट प्रकरणी एनआयएची तीन राज्यात ६० ठिकाणी छापेमारी

मुंबईत आत्मघाती हल्ल्याचा धोका असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. NIA कडून दहशतवादी कारवायांविरोधात धोक्याचा इशारा देण्यात आला होता. संशयित दहशतवादी सरफराज मेमनला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईत एका धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याची माहिती NIA ने मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणांना दिली होती. NIA ने दिलेल्या माहितीच्या आधारे इंदूर पोलिसांनी सरफराज मेमनला ताब्यात घेतले आहे.

( हेही वाचा: Maharashtra Budget Session 2023: विधानसभेत विरोधकांचा गोंधळ; फडणवीस संतापले अन् म्हणाले, ‘..तर हक्कभंग आणावा’ )

एटीएसकडून होणार चौकशी

एनआयएकडून मुंबई पोलिसांनी सतर्क राहण्याचा ई-मेल पाठवण्यात आला होता. त्यानुसार तपास सुरु होता. संबंधित संशयित इसम सरफराजला इंदूर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्र एटीएस इंदूरमध्ये दाखल झाली असून चौकशी करण्यात येईल. महाराष्ट्र एटीएस संशयित सरफराज मेमनची चौकशी करणार आहे.

संशयित दहशतवाद्याचे चीन, पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण

मुंबईत फिरत असलेली संशयित धोकादायक व्यक्ती इंदूरची राहणारी असून या व्यक्तीने चीन, हाॅंगकाॅंग आणि पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतली आहे, अशी माहिती NIA ने मेलद्वारे पोलिसांनी दिली होती. एनआयएकडून मुंबई पोलिसांना करण्यात आलेल्या ई-मेलमध्ये या संशयित व्यक्तीची कागदपत्रेही पाठवली होती. त्याचा तपास सुरु होता. दरम्यान, यासंदर्भात मुंबई पोलिसांनी इंदूर पोलिसांसोबतही संपर्क साधत सविस्तर माहिती दिली. यानंतर इंदूर पोलिसांनी संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here